छत्रपतींच्या त्याग-सेवा-पराक्रम या त्रिसूत्रीचा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:53+5:302021-04-02T04:29:53+5:30

सुधीर मुनगंटीवार : शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपुरात भगवा ध्वजाचे लोकार्पण चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ३२ मण सोन्याचे ...

Resolve the triad of Chhatrapati's sacrifice-service-power | छत्रपतींच्या त्याग-सेवा-पराक्रम या त्रिसूत्रीचा संकल्प करा

छत्रपतींच्या त्याग-सेवा-पराक्रम या त्रिसूत्रीचा संकल्प करा

सुधीर मुनगंटीवार : शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपुरात भगवा ध्वजाचे लोकार्पण

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन महत्वाचे नव्हते. त्यांच्यासाठी प्रजेचे राज्य महत्वाचे होते. रयतेचे राज्यच त्यांची संकल्पना होती. शेतकरी हा त्यांच्या राज्याचा केंद्रबिंदू होता. त्याग, सेवा, पराक्रम ही त्यांची त्रिसूत्री होती. त्यांच्या विचारावर चालण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. त्याग-सेवा-पराक्रम या त्रिसूत्रीचा संकल्प पूर्ण करून छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करा,असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सवानिमित्य आयोजित भव्य उंच भगवा ध्वज लोकार्पण सोहळ्यात उद्घा‌टक म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा गटनेते संदीप आवारी, महिला बाल कल्याण सभापती चंद्रकला सोयाम, उपसभापती पुष्पा उराडे, झोन सभापती संगिता खांडेकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा (श)महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, विठ्ठलराव डुकरे, सचिन कोतपल्लीवार, उपाध्यक्ष सुरज पेदूलवार उपस्थिती होते. संचालन डॉ. प्रशांत आर्वे, आभार नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी मानले.

Web Title: Resolve the triad of Chhatrapati's sacrifice-service-power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.