कोरोना प्रादुभार्वाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड तथा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना बाहेर राज्यात विशेषत: तेलंगणा व आंध्र प्रदेशातील मंचेरीअल, करीमनगर व कागजनगर येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातील संबंधित रुग्णालय, महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायतीत रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांस मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या आरोग्य विभागाशी चर्चा करून समस्या सोडविण्याची मागणी उपमहापौर राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेऊन हा विषय मार्गी लावण्यासंबंधात आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.
राज्याबाहेर मृत झालेल्या बाधितांच्या प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST