सुधीर मुनगंटीवार : राष्ट्रीय जबाबदारी समजून घेण्याचे आवाहनचंद्रपूर : मागील बऱ्याच वर्षापासून वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग, वातावरणातील बदल अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्याकरिता व पर्यावरण संतुलन ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. तसेच या वृक्षांचा सांभाळ करण्याकरिता जनसहभागाची आवश्यकता आहे. राज्यातील ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आणण्यासंदर्भात येत्या १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा सर्व शासकीय यंत्रणेनी राष्ट्रीय जबाबदारी समजून वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज वने मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाची १ जुलै २०१६ रोजी राज्यात करण्यात येणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, आमदार समीर कुनावार, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, सचिव (वने) विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त सचिन कुर्वे, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून वृक्ष लागवड हे शासकीय काम असे समजून न करता प्रत्येकाने आपले जीवन मूल्य समजून करावे. वृक्ष लागवडीसाठी देशातील मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांनी २५ हजार वृक्ष लागवड करणार असल्याचे व सिने कलावंत नाना पाटेकर, विवेक ओबेराय असे मोठे उद्योजक येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प
By admin | Updated: June 22, 2016 01:18 IST