शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका, दोघांना अटक

By राजेश मडावी | Updated: September 12, 2023 16:30 IST

अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार

चंद्रपूर : तेलंगणा राज्यात कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांची बल्लारपूर पोलिसांनी सोमवारी (दि. ११) रात्री आठ वाजता टोलनाक्यावरून सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक झाली. एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. शेख अहमद शेख मुर्तजा (२५), शेख इस्माईल शेख हुसेन (२४, दोघेही बल्लारपूर) अशी आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेतलेली जनावरे लोहारा येथील उज्ज्वला गौरक्षण संस्थेत संगोपनासाठी नेण्यात आल्या आहेत.

जनावरांची तस्करी सुरू असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. रात्री गस्ती घालत असताना विसापूर टोलनाक्याजवळ (एमएच ३४ एबी ३१८२) क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता चंद्रपूरवरून तेलंगणा राज्यात अवैधरीत्या १५ गायी, ११ गोरे व दाेन बैल असे एकूण २८ गोवंश कत्तलीसाठी नेले जात होते. जनावरांचे पाय दोरीने बांधून ट्रकमध्ये कोंबून ठेवले होते. पोलिसांनी शेख अहमद शेख मुर्तजा व शेख इस्माईल शेख हुसेन (२४, रा. राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपूर) यांना अटक केली तर एक आरोपी फरार आहे. जनावरे व ट्रकसह एकूण १३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सलीम शेख करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरcowगाय