अंगणवाडी मदतनीसांचे पालकमंत्र्यांना निवेदन
By Admin | Updated: February 5, 2017 00:39 IST2017-02-05T00:39:31+5:302017-02-05T00:39:31+5:30
शहरी तथा ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी मदतनिसांचे शिष्टमंडळ पवित्रा ताकसांडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटले व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

अंगणवाडी मदतनीसांचे पालकमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर : शहरी तथा ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी मदतनिसांचे शिष्टमंडळ पवित्रा ताकसांडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटले व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देताना ती मदतनिस शहरी भागात त्याच प्रभागातील असावी ही अट रद्द करण्याची मागणी केली. मदतनिस मॅट्रीक पास असेल तर तिला दोन वर्षापेक्षा जास्त अनुभव नसेल तर सेविकेच्या पदावर तिला पदोन्नती देण्यात येते. परंतु शहरी भागात ती मदतनिस त्याच प्रभागाची असावी ही अट असल्याने सेवाज्येष्ठ मदतनिसावर अन्याय होत आहे. तेव्हा प्रभागाची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आपला प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले. (प्रतिनिधी)