राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 00:39 IST2017-03-13T00:39:03+5:302017-03-13T00:39:03+5:30
महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने महिलांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविले.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने महिलांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
सदर निवेदनात महिला अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणेच दोन वर्षाची बालसंगोपन रजा देण्यात यावी, आस्थापना असलेल्या कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावे, शासकीय कार्यालयात स्वच्छतागृह तयार करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी लैगिंक अत्याचार प्रतिबंध व निर्मुलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता दक्षता समिती स्थापन करण्यात यावी, महिला अधिकाऱ्यांना दुय्यमतेची भावना न बाळगता कार्यकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी, अधिकारी महासंघाप्रमाणेच सर्व संघटनामध्ये पुरेशा प्रमाणात महिला प्रतिनिधींचा समावेश असावा, चक्राकार विभागवार बढत्या व नियुक्त्यात महिलांना सुट असावी, पती-पत्नी एकत्रीकरणासाठी असलेली एक वर्षाची अट रद्द करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी वैभाव नवाडकर, सरचिटणीस डॉ. अविनाश सोमनाथे यांच्या नेतृत्वात राज्य महिला सहचिटणीस डॉ. सुचिता धांडे, अध्यक्ष डॉ. कांचन जगताप, नायब तहसीलदार उषा चौधरी, तहसीलदार बहादे, सहाय्यक कोषाकार अधिकारी पाटील आदीची उपस्थिती होती.