बल्लारपुरात प्रजासत्ताक दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:50+5:302021-02-05T07:36:50+5:30
येथील उप विभागीय कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावून सलामी देण्यात ...

बल्लारपुरात प्रजासत्ताक दिवस साजरा
येथील उप विभागीय कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावून सलामी देण्यात आली. यावेळी तहसीलदार संजय राईंचवार,नायब तहसीलदार आर.एन. कुळसंगे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व अजय मेकलवार तसेच तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी व नागरिकांची यांची उपस्थिती होती.
नगरपरिषद कार्यालय
नगरपरिषद कार्यालय प्रांगणात नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी ध्वजारोहण करून सलामी दिली. ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अर्पिता वावरकर यांनी तिरंगा फडकवून सलामी दिली. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, डॉ.सुकेशनी कांबळे, आशा साळवे, आरोग्य सहाय्यक सुरेश मेश्राम, गजानन खिरटकर यांची उपस्थिती होती.
पशुवैद्यकीय कार्यालय
येथील तालुका पशुवैद्यकीय कार्यालयात उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष रायपुरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात प्रा.छाया भैसारे, अशोक क्षीरसागर, लोणारे व पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते