महाविद्यालय व सामाजिक न्याय विभागावर गुन्हा नोंदवा

By Admin | Updated: March 5, 2016 00:53 IST2016-03-05T00:53:07+5:302016-03-05T00:53:07+5:30

चंद्रपूर येथील लोकेश विजय येरणे येरमे याने नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

Report crime against the College and Social Justice Department | महाविद्यालय व सामाजिक न्याय विभागावर गुन्हा नोंदवा

महाविद्यालय व सामाजिक न्याय विभागावर गुन्हा नोंदवा

तहसीलदारांना निवेदन : संताजी महिला संघटनेचा पुढाकार
सिंदेवाही : चंद्रपूर येथील लोकेश विजय येरणे येरमे याने नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करून महाविद्यालय प्रशासन व सामाजिक न्याय विभागाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील संताजी महिला संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासकीय परिपत्रकानुसार विद्यार्थी ओबीसी गटात व वार्षिक उत्पन्न एक लाख असल्यामुळे तो विद्यार्थी भारत सरकारच्या स्कॉलरशिप पात्र होता. त्यानुसार विद्यार्थीला ५० टक्के रक्कम भरण्यास तयार होता. परंतु महाविद्यालयाने १०० टक्के शुल्क भरण्याचे फर्मान सोडले. कागदपत्र देण्यासही महाविद्यालय प्रशासनाने टाळाटाळ केली. त्यामुळे निराश होवून लोकेशने आत्महत्या असा आरोप संताजी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात तहसिलदार मडावी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Report crime against the College and Social Justice Department