चंद्रपूर : थर्मल पॅावर स्टेशनमधील कंत्राटी कामगारांची मिटिंग नुकतीच पार पडली. या मिटिंगमध्ये शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम आदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद गोडघाटे, रमेशचंद्र दहीवडे, चंदन तपासे, जयसिंग कोसे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना थर्मल पुरुषोत्तम आदे म्हणाले, थर्मल पाॅवर स्टेशनमधील कंत्राटी कामगारांना ठेकेदार गुलामाप्रमाणे वागणूक देत आहे. कोरोनाकाळात मार्च ते ऑगस्ट या काळातील कपात केलेली प्राॅव्हिडंट फंडाची रक्कम कामगारांना परत करण्याचा निर्णय झाला असला तरी बऱ्याच कामगारांना परत केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी रमेचंद्र दहीवडे यांनी शेतकऱ्यांविरोधात केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याचा निषेध केला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार संजय निकोडे यांनी मानले.