सिंदेवाही स्मशानभूमीची दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:21+5:302021-02-05T07:33:21+5:30
सदर स्मशानभूमीवरील जागेवर अतिक्रमण केलेले आहे. या स्मशानभूमीवर सिंदेवाही नगरपंचायतकडून काही कालावधीपूर्वी टिनचे शेड लावण्यात आल्यामुळे ...

सिंदेवाही स्मशानभूमीची दुरुस्तीचे काम सुरू
सदर स्मशानभूमीवरील जागेवर अतिक्रमण केलेले आहे. या स्मशानभूमीवर सिंदेवाही नगरपंचायतकडून काही कालावधीपूर्वी टिनचे शेड लावण्यात आल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात सुविधा मिळत होती. परंतु आजमितीस ते शेड मोडकळीस आल्याने सिंदेवाहीकरांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची तालुका संघर्ष समिती, व्यापारी असोसिएशनचे व इतर संघटनाच्या वतीने निवेदन तसेच तोंडी माहिती देण्यात आली होती. स्मशानभूमीची तात्पुरती टिन शेड व ओटा दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील नगरपंचायतला अत्याधुनिक स्मशानभूमी लाभली असून निधीची पूर्तता झाल्याबरोबर प्रस्तावित असलेली सोययुक्त अशी स्मशानभूमी नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे. मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड , नगराध्यक्ष आशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावळे हे स्वत: या कामाकडे लक्ष देऊन आहेत.