तळोधीत अवैध व्यवसायाने काढले पुन्हा डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:42+5:302021-08-25T04:32:42+5:30

तळोधी बाः पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वाढोणा, गोंविदपूर, गिरगांव, सावरगांव, बालापूर व तळोधी बा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध ...

Removed by illegal business at the bottom again on the head | तळोधीत अवैध व्यवसायाने काढले पुन्हा डोके वर

तळोधीत अवैध व्यवसायाने काढले पुन्हा डोके वर

तळोधी बाः पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वाढोणा, गोंविदपूर, गिरगांव, सावरगांव, बालापूर व तळोधी बा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू, सट्टा व्यवसाय व जुगार व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

तळोधी बा. पोलीस स्टेशनअंतर्गत ४२ गावांचा समावेश आहे. ठाणेदार व अनेक पोलीस शिपायांच्या बदल्या झाल्यामुळे, या भागातील अवैध व्यवसाय करणारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. अनेक अवैध व्यवसाय बळावले आहे. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नसल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची हिंमत वाढलेली आहे. गावागावात अशांतता पसरत आहे. सट्टा व्यवसाय करणारेही पानटपरी व हाॅटेलमधून पट्टी कापून गरीब जनतेची लूट करीत आहेत. महिला वर्ग पोलिसांच्या भूमिकेवर शंका निर्माण करीत आहे. या परिसरातील अवैध बंद करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Removed by illegal business at the bottom again on the head