स्वातंत्र्यासाठी शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:52+5:302021-02-05T07:39:52+5:30
यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, झोन सभापती प्रशांत चौधरी, नगरसेविका वंदना तिखे, ...

स्वातंत्र्यासाठी शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा
यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, झोन सभापती प्रशांत चौधरी, नगरसेविका वंदना तिखे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील, मनोज गोस्वामी, अनिल घुले, भाऊराव सोनटक्के, जनसंपर्क अधिकारी युधिष्ठिर रैच, प्रदीप मडावी, प्रदीप पाटील, विकास दानव, गुरुदास नवले, मयूर मलिक उपस्थित होते. महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असताना २०६ हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी पाच वर्षे २५ कोटींचा निधी दिला होता. याच निधीतून शहरातील हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण झाले. याचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी करण्यात आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जटपुरा गेट व गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी व इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.