मुद्राच्या प्रचार साहित्याचे विमोचन
By Admin | Updated: March 13, 2017 00:38 IST2017-03-13T00:38:18+5:302017-03-13T00:38:18+5:30
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार होऊन खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

मुद्राच्या प्रचार साहित्याचे विमोचन
चंद्रपूर : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार होऊन खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या प्रचार साहित्याचे विमोचन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते नवमिर्तीत कृषी भवन येथे झाले.
यावेळी आमदार नाना शामकुळे, आ.अॅड. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते. स्वयंरोजगार सुरु करु इच्छिणाऱ्या होतकरु युवकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा बंक योजना अतिशय लाभदायी आहे. जुन्या व्यवसायिकांनाही योजनेअंतर्गत व्यवसायवाढीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते.
या योजनेअंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. ही योजना अधिकाधिक गरजू व होतकरु युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना प्रचार-प्रसार व समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मुद्रा योजनेची सविस्तर माहिती असलेल्या जनजागृती फोमसीट व स्टॅन्डीचे विमोचन करण्यात आले. राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्रामीण भागातील शाखामध्ये सदर जनजागृती साहित्य लावण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)