दोन डिजीटल वर्गखोल्यांचे लोकार्पण

By Admin | Updated: March 13, 2016 01:01 IST2016-03-13T01:01:43+5:302016-03-13T01:01:43+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना, दोन डिजीटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा आणि बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला.

The release of two digital classrooms | दोन डिजीटल वर्गखोल्यांचे लोकार्पण

दोन डिजीटल वर्गखोल्यांचे लोकार्पण


चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना, दोन डिजीटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा आणि बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला.
विशेष म्हणजे, या डिजीटल वर्गासाठी लागणारा १ लाख ६८ हजार रुपयांचा निधी कळमना येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभारला. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. या डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन कळमना ग्रामपंचायतीचे सरपंच सुशिला मडावींनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत शेडमाके होते. यानिमित्ताने महिला प्रबोधन मेळाव्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल चव्हाण, मंजुषा रंगारी, रेहाना बंदाली, सुनंदा कवठे, रेखा रेनकुंटलवार, रफिका कुरेशी, गीता चिवाणे, माधुरी बरडे, बेबीनंदा उमरे आदी महिलांनी मार्गदर्शन केले.
बाल आनंद मेळाव्याला संवर्ग विकास अधिकारी गजभे व गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बावणे, रूपेश पोडे, ज्ञानेश्वर लोहे, सतीश बावणे, रामचंद्र कंबलवार, चंद्रकांत नरहरशेट्टीवार, धुलाराम टोंगे, शेखलाल कुरेशी आदी उपस्थित होते. संचालन मधुसुदन टोंगे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The release of two digital classrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.