सावली येथे शिवार पुरवणीचा प्रकाशन सोहळा

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:14+5:302016-04-03T03:50:14+5:30

लोकमत वृत्त हे सर्वसामान्यांना न्याय देणारं आणि सामान्य नागरिकांच्या भावनांची जाणीव ठेवणारं वृत्तपत्र असल्याचे ...

Release ceremony of Shivalar Supplementary at Sawli | सावली येथे शिवार पुरवणीचा प्रकाशन सोहळा

सावली येथे शिवार पुरवणीचा प्रकाशन सोहळा

सावली : लोकमत वृत्त हे सर्वसामान्यांना न्याय देणारं आणि सामान्य नागरिकांच्या भावनांची जाणीव ठेवणारं वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’च्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सावली तालुका ‘शिवार’ पुरवणीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी केले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा प्रकाशन समारंभ शनिवारी पार पडला. यावेळी सावलीच्या तहसिलदार वंदना सौरंगपते, सावलीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. निकम, सावली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी एल.जी. पेंढारकर, जि.प. सदस्य दिनेश पा. चिटनुरवार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दक्षक मुन, विस्तार अधिकारी (रोहयो) संजय नैताम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकमत’चे सावली तालुका प्रतिनिधी उदय गडकरी यांनी केले. संचालन शहर प्रतिनिधी प्रकाश लोनबले तर उपस्थितांचे आभार गेवराचे वार्ताहर दिलीप फुलबांधे यांनी मानले.
याप्रसंगी उपरीचे वार्ताहर ज्ञानेश्वर सिडाम तसेच वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Release ceremony of Shivalar Supplementary at Sawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.