प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाणी योजनेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:48+5:302021-03-19T04:26:48+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची योजना पूर्णत्वाच्या मार्गावर बल्लारपूर : शहरातील जनतेला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटी योजनेचे काम पूर्णत्वाच्या ...

प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाणी योजनेची पाहणी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची योजना पूर्णत्वाच्या मार्गावर
बल्लारपूर : शहरातील जनतेला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटी योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, या कामाची पाहणी करण्यासाठी नागपूर मजीप्रा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता आपल्या टीमसह बुधवारी बल्लारपुरात येऊन वर्धा नदीवर तयार होत असलेल्या रेडियल विहिरीच्या बांधकामाची पाहणी केली आणि आवश्यक निर्देश दिले.
बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा-२ च्या कामाची पाहणी करताना मजीप्राचे प्रादेशिक मुख्य अभियंता सतीश सुशीर यांनी सदर योजनेचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश दिले. यावेळी सहायक मुख्य अभियंता कल्पना भोळे, तसेच अधीक्षक अभियंता संतोष गव्हाणकर, कार्यकारी अभियंता झलके,घोडमारे, मजीप्रा उपविभागीय अभियंता सुशील पाटील, शाखा अभियंता श्रीकांत येरणे, गजानन बारापात्रे, अजय कोतपल्लीवार, कंत्राटदार मंगुकिया, राकेश पटेल यांची उपस्थिती होती.
बॉक्स
आढावा बैठकीही घेतली
पाहणीनंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांची ग्रीड पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. जिवती, गोंडपिपरीची पाणी पुरवठा योजनेची कामे पावसाळ्यापूर्वी करून बल्लारपूर पाणी पुरवठा योजनेतील १८ लाख व ७.५० लाखाच्या नवीन पाणी टाकीद्वारे पाणी पुरवठा सर्व नवीन जलवाहिन्यांना जोडून पाणीपट्टी वसुली वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.