बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलैला महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:37 IST2019-06-30T21:36:59+5:302019-06-30T21:37:16+5:30

ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह, फुटक्या किल्ल्याजवळ, हॉस्पीटल वार्ड चंद्रपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Regarding the birth anniversary of Babuji, on July 2, the Maharaktadan camp was organized | बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलैला महारक्तदान शिबिर

बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलैला महारक्तदान शिबिर

ठळक मुद्देलोकमत व लाईफलाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटरचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह, फुटक्या किल्ल्याजवळ, हॉस्पीटल वार्ड चंद्रपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी व खासगी नोकरीतील कर्मचारी, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आदींनी सहभागी होऊन रक्तदान करावे. अधिक माहितीकरिता सोनम मडावी (९९७५६६६३५५) व पवित्रकुमार गैन (७६२०७४७०७२) यांच्याशी संपर्क साधावा.
लोकमत सखी मंच, वाचकांना आवाहन
बाबुजींच्या जयंतनिमित्त होणाऱ्या या समाजिक उपक्रमात सखी मंच सदस्य व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्याला ब्लड डोनर कार्डचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Web Title: Regarding the birth anniversary of Babuji, on July 2, the Maharaktadan camp was organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.