रिफाईंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:06+5:302021-08-18T04:34:06+5:30
सध्या बाजारातील अनेक प्रकारचे खाद्य तेल उपलब्ध आहे. परंतु, तेलाचा अतिवापर, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ ...

रिफाईंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!
सध्या बाजारातील अनेक प्रकारचे खाद्य तेल उपलब्ध आहे. परंतु, तेलाचा अतिवापर, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ खाणे, अधिक दिवसाचे घाणीचे तेल खाणे या सर्व गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. काही तेलामध्ये केमिकल्सचा वापर केला जात असल्याने शरीरात ब्लॉकेजस तयार होत असतात. त्यामुळे हृदयरोगाला सामोर जावे लागत असते. परिणामी आता नागरिकांनी लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
म्हणून वाढत आहेत हृदरोगी
देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारामध्ये शुद्ध तेलाचा वापर करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ट्रिपल फिल्टर केलेले तेल खाणे आवश्यक आहे. नागरिकांनी करडई, सूर्यफूल तेलाचा खाण्यात वापर करावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बॉक्स
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
पूर्वी घाणीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. मात्र त्यानंतर विविध कंपन्याचे रिफाईंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. त्यामुळे शहरातील तेलाचे घाणे काही ठिकाणी बंद आहेत. परंतु, आता या तेलाची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात असे तेलाचे घाणे सुरू आहेत.
बॉक्स
रिफाईंड तेल घातक का?
तेलामध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. याउलट घाण्याच्या तेलामध्ये पोष्टिक तत्त्वे असतात. तेल जेवढे रिफाईंड केले जाते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीशी होतात. त्यामुळे रिफाईंड तेलापेक्षा घाण्याचे तेल अधिक पौष्टिक असते. त्यामुळे आता नवी पिढी रिफाईंड तेलापेक्षा घाण्याच्या तेलाचा वापर अधिक करीत आहेत.
कोट
रिफाईंडच्या तेलापेक्षा घाणीच्या तेलामध्ये अधिक पौष्टिक तत्त्वे, मिनरल्स असतात. त्यामुळे ते तेल आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. कोणतीही वस्तू जेवढी रिफाईंड केली जाते तेवढे त्यातील पोषक द्रव्ये नाहीशी होतात. त्यामुळे आता अनेकजण घाण्याचा तेलाचा वापर करीत आहेत. परंतु, कोणत्याही तेलाचा अधिक वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामुळे तेलाचा वापर प्रमाणात करणे गरजेचे आहे.
-डॉ. अशोक वासलवार, हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूर