विद्युत ग्राहकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करा
By Admin | Updated: May 9, 2016 01:01 IST2016-05-09T01:01:44+5:302016-05-09T01:01:44+5:30
वरोरा उपविभागांतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये विजेसंदर्भात समस्या असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.

विद्युत ग्राहकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करा
मागणी : वरोरा शहर काँग्रेसचे अभियंत्याला निवेदन
वरोरा: वरोरा उपविभागांतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये विजेसंदर्भात समस्या असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या ग्राहकाच्या समस्या तातडीने सोडण्यात याव्या, अन्यथा वरोरा शहर काँगे्रस कमिटीच्यावतीने आंदोलन छेडण्याच्या इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वरोरा तालुक्यातील एर्काजुना शेवळ व नोजा या गावांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ट्युबवेल तयार करण्यात आल्या. विद्युत लाईन टाकण्यात आली. परंतु विद्युत मिटर देण्यात आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात ट्युबवेल खोदल्या. त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, कृषी पंप विद्युत लाईनचे प्रलंबित अर्ज कनिष्ठ अभियंता यांचे कार्यालयातून बोलावून शेतकऱ्यांना डिमांड देण्यात यावे, विद्युत ग्राहकांना पाठविलेले डिमांड ग्राहकांना नियमानुसार वाजवी दराचे विद्युत बिल पाठवून ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्यात यावी, आदी मागण्यांबाबतचे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नगराळे यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष छोटु शेख, पं.स. सभापती सुनंदा जिवतोडे, लक्ष्मण गमे, डॉ. हेमंत खापणे, अरुण कापटे, अशोक बावणे, सचिन मेश्राम, राहुल देवळे, मुन्ना पाठक, कादर शेख, विजय कोयचाडे, सतीश सोनटक्के, अनिल डोये, हुसेन पठान, संकेत टोंगे, अरुण पोंगळे, हनुमान चिंचोलकर, दत्तु पारोघे, सुनील जिवतोडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)