लाल नाला मुख्य कालव्यातून मोखाळा उपकालवा काढणार

By Admin | Updated: August 29, 2015 01:23 IST2015-08-29T01:23:38+5:302015-08-29T01:23:38+5:30

तालुक्यातील मोखाळा गावापासून सोईट गावापर्यंत लाल नाला प्रकल्पातील मुख्य कालवा काढण्यात आला आहे.

The red canal will remove the mokhala subcollection from the main canal | लाल नाला मुख्य कालव्यातून मोखाळा उपकालवा काढणार

लाल नाला मुख्य कालव्यातून मोखाळा उपकालवा काढणार

वरोरा : तालुक्यातील मोखाळा गावापासून सोईट गावापर्यंत लाल नाला प्रकल्पातील मुख्य कालवा काढण्यात आला आहे. या मुख्य कालव्यातून मोखाळा गावापासून उपकालवा काढण्यात यावा, याकरिता आमदार बाळू धानोरकर यांनी जलसंपदा तथा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना भेटून चर्चा करीत निवेदन दिले.
वरोरा तालुक्यातील लाल नाला प्रकल्पातील मुख्य कालवा मोखाळा गावापासून सोईट गावापर्यंत गेला आहे. परंतु मोखाळा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नाही. त्यामुळे मोखाळा गाव परिसरातील शेतकरी सिंचनापासून मागील कित्येक वर्षापासून वंचित राहात आहे. लाल नाला मुख्य कालव्यातून उपकालवा मोखाळा येथून काढल्यास मोखाळा, आल्फर, साखरा, लोधीखेडा व पोहे या गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरिता उपयुक्त होईल व ३०० हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. याकरिता लाल नाला मुख्य कालव्यातून मोखाळा उपकालवा काढावा, यासाठी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत आमदार बाळू धानोरकर यांनी चर्चा केली.
राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मोखाळा उपकालव्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिल्याने येत्या काही महिन्यात मोखाळा उपकालव्याच्या कामास प्रारंभ होणार आहे.
शिवतारे यांना निवेदन देताना चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, शहर प्रमुख सुरेश पचारे, सतनाम सिंग सोखी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The red canal will remove the mokhala subcollection from the main canal