प्रवेशपत्रासाठी ५० रूपयांची वसुली

By Admin | Updated: March 2, 2016 00:17 IST2016-03-02T00:17:38+5:302016-03-02T00:17:38+5:30

इयत्ता दहावी बोर्डाच्या पेपरला प्रवेश घेण्याकरिता प्रती विद्यार्थी ५० रुपयाची अवैध वसुली केल्याचा प्रकार बल्लारपूर

Recovery of Rs.50 for signatory | प्रवेशपत्रासाठी ५० रूपयांची वसुली

प्रवेशपत्रासाठी ५० रूपयांची वसुली

येनबोडीतील प्रकार : परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची लूट
कोठारी : इयत्ता दहावी बोर्डाच्या पेपरला प्रवेश घेण्याकरिता प्रती विद्यार्थी ५० रुपयाची अवैध वसुली केल्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयात उघडकीस आला. या प्रकाराने गोरगरीब ग्रामीण शेतकरी, शेतमजूर पालकांत संताप पसरला आहे.
परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्राची गरज असते. मात्र त्यासाठी फीची किंवा दंडाची किंवा अवैध वसुली करण्याचे अधिकार नाहीत. तरीही शाळेची दुरुस्ती व पाहुण्याचे आवभगत करण्यासाठी तसेच परिक्षेच्या वेळी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाची तजबीज करण्यासाठी प्रती विद्यार्थी ५० रुपयाची वसुली करण्यात आली. ही वसुली दरवर्षीच केल्या जाते.
उलट त्यात यावर्षी २० रुपयाची वाढ केल्याचे शाळेतील शिक्षकांनी छातीठोकपणे सांगितले. परीक्षा प्रवेश पत्रासाठी शाळेने प्रती विद्यार्थ्यांकडून केलेली ५० रुपयाची वसुली अवैद्य असून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.
यात ३०० विद्यार्थ्यांकडून १५ हजाराची वसुली केल्याचे समजते. घेतलेले पैसे शाळेने त्वरित परत करण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Recovery of Rs.50 for signatory