गौण खनिज वाहतूकदाराकडून एक लाख दंड वसुली
By Admin | Updated: June 22, 2015 01:07 IST2015-06-22T01:07:28+5:302015-06-22T01:07:28+5:30
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असून अवैध रेती, गिट्टी, दगड वाहतूक करणाऱ्या सहा गाड्या जप्त करुन अवैधरित्या ....

गौण खनिज वाहतूकदाराकडून एक लाख दंड वसुली
अवैध उत्खनन : राजुरा तहसीलदारांची कारवाई
राजुरा: राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असून अवैध रेती, गिट्टी, दगड वाहतूक करणाऱ्या सहा गाड्या जप्त करुन अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांकडून जवळपास एक लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
या राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांच्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज चोरुन विकणाऱ्या वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. राजुरा तालुक्यातील संजय निकम, अब्दुल कुरेशी, काशिनाथ किंगरे, शेषराव बोंडे, नूर महदम, सय्यद फिरोज, परशुराम निकोडे यांच्या कडून अवैध वाहतूक करणाऱ्या गाडी मालकांकडून दंड वसुल करण्यात आल्याची माहिती राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी दिली.
राजुरा तालुक्यातील देवाडा, बामनवाडा, चुनाळा, विरुर स्टेशन या भागात मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरुन विकण्याचा सपाटा सुरु असून याची गोपनिय माहिती राजुराचे तहसीलदार फुसाटे यांना मिळताच, त्यांनी चौकशी केली.एक वाहन मालक तर जेसीबीद्वारे अवैध उत्खनन करीत असल्याचे चौकशीदम्यान दिसून आले. (शहर प्रतिनिधी)