नागरी आरोग्य केंद्रातील १७ परिचारिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST2021-05-14T04:27:29+5:302021-05-14T04:27:29+5:30

बल्लारपूर : कोरोना काळात रुग्णाची सेवा करणाऱ्या नर्सेसचा परिचारिका दिनाच्या निमित्ताने येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय समाजशास्त्र विभागाअंतर्गत सत्कार ...

Reception of 17 nurses from Civil Health Center | नागरी आरोग्य केंद्रातील १७ परिचारिकांचा सत्कार

नागरी आरोग्य केंद्रातील १७ परिचारिकांचा सत्कार

बल्लारपूर : कोरोना काळात रुग्णाची सेवा करणाऱ्या नर्सेसचा परिचारिका दिनाच्या निमित्ताने येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय समाजशास्त्र विभागाअंतर्गत सत्कार करण्यात आला.

वस्ती विभागातील नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या १७ परिचारिकांचा समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. शुभांगी भेंडे, शर्मा यांच्या हस्ते मास्क व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

वस्ती विभागातील नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या परिचारिका कोरोनाच्या संकटात संसर्ग होण्याची भीती न बाळगता रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर आहेत. त्यांच्या धाडसाला दाद देण्यासाठी समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सर्व नर्सेसचा सत्कार केला. यावेळी डॉ. ज्योती डांगे, परिचारिका भारती बावणे, प्रज्ञा हस्ते, वैशाली तुळसकर, माधुरी बल्की, ज्योती लिंगायत व इतर परिचारिका यांची उपस्थिती होती.

Web Title: Reception of 17 nurses from Civil Health Center