घंटागाडीच्या अनियमिततेमुळे कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:56+5:302021-01-17T04:24:56+5:30
अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. नगर परिषद झाली असली तरी सध्या कागदावरच आहे. प्रशासक म्हणून तहसीलदारांनी सूत्रे ...

घंटागाडीच्या अनियमिततेमुळे कचऱ्याचे साम्राज्य
अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे.
नगर परिषद झाली असली तरी सध्या कागदावरच आहे. प्रशासक म्हणून तहसीलदारांनी सूत्रे हातात घेतली असली तरी त्यांच्यासमोर ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने त्या नियोजनामध्ये ते व्यस्त असल्याने घुग्घुसला वेळ देऊ शकत नाही. सध्या गावाचे नियोजन गडबडले आहे. दररोज गावात कचरा संकलनाकरिता सुमारे २० घंटागाड्या आहेत. गावात सहा वाॅर्ड आहेत. त्यात वेकोलिच्या कामगार वसाहतीचा समावेश आहे. वेकोलिच्या कामगार वसाहतवगळता त्या परिसरातील काही लोकवसाहती व घुग्घुस लोकवसाहतमध्ये कचरा संकलन स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून दररोज होत असते. मात्र मागील काही दिवसापासून दोन-तीन दिवसांनी येत असल्याने घंटागाडीची प्रतीक्षा करून महिला मंडळी गावानजीक जिथे जागा मिळेल तिथे कचरा टाकून मोकळी होतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. कचरा संकलन नेहमीप्रमाणे नियमित करण्याची गरज आहे.