शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

इरई नदीच्या लाल-निळ्या रेषेची नव्याने पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:34 PM

चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी  झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई नदी चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. अनेकांनी नियम धाब्यावर बसवून पूरग्रस्त भागातच घरे बांधल्याने यंदा प्रचंड फटका बसला. या नदीच्या लाल व निळ्या रेषेबाबत यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. या सर्व्हेची नव्याने पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी अधिक शास्त्रोक्त झाल्यास भविष्यातील बाधित क्षेत्राचे नुकसान टाळण्याची आशा निर्माण झाली आहे.चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी  झाली. ही समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता श्याम काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे उपस्थित होते. इरई नदीच्या लाल व निळ्या रेषेबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. काही जमिनीवर इरई नदीच्या पुराचे पाणी पोहोचले नाही, अशाही काही जमिनी निळ्या लाईनमध्ये आल्या आहेत. हे क्षेत्र मोठे असल्याने नागरिक यात भरडले जाऊ नयेय. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका व पाटबंधारे विभागाने सामूहिक सर्वेक्षण करून शास्त्रोक्त टिपणी तयार करण्यात येणार आहे. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणाची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी झाल्यास नियमानुसार घरे बांधणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

इरईच्या १८९१ पासूनच्या पुराची स्थितीचंद्रपुरात ३ सप्टेंबर १८९१ रोजी पूर आला. या पुराची पठाणपुरा गेटवर १८३.०६ मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै १९१३ मध्ये १८०.०६ मीटर, ऑगस्ट १९५८ मध्ये १८१.३३ मीटर, सप्टेंबर १९५९ मध्ये १८०.८९ मीटर, ऑक्टोबर १९८६ मध्ये १८०.७६ मीटर मार्किंग असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली.

चंद्रपुरात असेही काही भाग आहेत. जिथे निळी रेषा आहे, मात्र तेथे पाण्याचा एकही थेंब पोहोचला नाही.  निळ्या रेषेने ४५० हेक्टर क्षेत्र बाधित होते. त्यामुळे आयआयटीच्या सर्वेक्षणाच्या पडताळणीची गरज आहे. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री

 

टॅग्स :riverनदी