राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:02+5:302021-02-05T07:35:02+5:30
सिंदेवाही : स्थानिक श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, सिंदेवाही येथे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा
सिंदेवाही : स्थानिक श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, सिंदेवाही येथे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी भारतकुमार धुर्वे, ज्येष्ठ प्रचारक बाबा धनकर उपस्थित होते. भारतकुमार धुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर बाबा धनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. बाबा धनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपालकाला व सर्वधर्म समभाव प्रार्थना कार्यक्रम झाला. यानिमित्त सकाळी सामुदायिक ध्यान, दुपारी भजन तसेच सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवक पांडुरंग मडावी, अशोक रतन कोवे, चंद्रभान कोवे, अशोक सागुळले, दिनकर उईके, तिडके, मोहुर्ले, जेंगठे, माधव आदे व गुरुदेव भक्त उपस्थित होते. कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला. गोपालकाला व सर्वधर्म प्रार्थना तसेच राष्ट्रसंतांना दुपारी मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. महाप्रसादाचे वाटप करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.