रणमोचन खरकाडा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:23+5:302021-01-19T04:29:23+5:30

गेल्या आठ-दहा वर्षांअगोदर या मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. त्यानंतर, डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था ...

Ranmochan Kharkada road condition | रणमोचन खरकाडा रस्त्याची दुरवस्था

रणमोचन खरकाडा रस्त्याची दुरवस्था

गेल्या आठ-दहा वर्षांअगोदर या मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. त्यानंतर, डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उर्वरित बहुतांशी रस्त्यांचे रखडलेले काम पूर्ण होतील, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, हे सरकार अयशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट चित्र या रस्त्यांच्या बिकट परिस्थितीवरून लक्षात येत आहे. सदर रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, रस्त्यावर पूर्णतः गिट्टी उखडलेली असून, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकी, सायकल चालविणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे त्वरित खडीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी रणमोचन खडकाडा येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Ranmochan Kharkada road condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.