रणमोचन जि. प. शाळेत शहीद स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:26+5:302021-01-23T04:29:26+5:30

ब्रम्हपुरी : तालुक्यातील बरडकिन्ही येथून क्रीडा संमेलन आटोपून विजय ...

Ranmochan Dist. W. Martyr's Memorial Day at school | रणमोचन जि. प. शाळेत शहीद स्मृतिदिन

रणमोचन जि. प. शाळेत शहीद स्मृतिदिन

ब्रम्हपुरी : तालुक्यातील बरडकिन्ही येथून क्रीडा संमेलन आटोपून विजय प्राप्त करीत ट्रॅक्टरने गावाकडे परत येत असताना रुई विद्यानगरजवळ २२ जानेवारी १९९९ रोजी मिनी ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने रणमोचन शाळेतील चार बालकांचा मृत्यू झाला होता. आज तो दिवस शहीद स्मृतिदिन म्हणून शुक्रवारी रणमोचन जिल्हा परिषद शाळेत पार पडला.

प्यारेनंद पंढरी शंभरकर, प्रदीप वामन ठाकरे, प्रकाश शंकर ठाकरे, शांताराम नवलाजी राऊत हे चारही बालक मृत पावले होते. यावेळी या चारही बालकांना पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे होते. उपाध्यक्ष म्हणून शाळा शिक्षण समितीचे रेशम शंभरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सदाशिव ठाकरे, शांताराम दोनाडकर, उषा मेश्राम, लक्ष्मीबाई दोनाडकर, नवलाजी राऊत, वामन ठाकरे, नवल शंभरकर, शंकरजी ठाकरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक टेंभुने, झुरमुरे, रामटेके, मुंगले, किरमीरे, खोब्रागडे आदी उपस्थित होते.

Web Title: Ranmochan Dist. W. Martyr's Memorial Day at school