चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरचा रणजित युपीएससी परीक्षा उतीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:18 IST2019-04-06T14:18:32+5:302019-04-06T14:18:58+5:30
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरीचंद्र थिपे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून देशात त्याचा ४८० वा क्रमांक आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरचा रणजित युपीएससी परीक्षा उतीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरीचंद्र थिपे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून देशात त्याचा ४८० वा क्रमांक आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा ( युपीएससी) २०१८ च्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असून त्याचा देशात ४८० वा क्रमांक आला आहे. रणजितचे प्राथमिक शिक्षण गडचांदूर येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, माध्यमिक शिक्षण माणिकगड सिमेंट हायस्कूल तर पदवीचे शिक्षण के.आय.टी. कॉलेज कोल्हापूर येथे झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून दिल्ली येथे तो या परीक्षेची तयारी करीत आहे. त्याचे वडील व आई दोघेही शिक्षक असून वडील हरिचंद्र थिपे जवाहर नेहरू विद्यालय, आवारपूर येथे तर आई ज्योती ही सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे कार्यरत आहे.