बल्लारपुरात रंगली लोकशाहीरांची मैफिल; वामनदादांच्या गीतांनी आठवणीला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST2021-08-19T04:32:02+5:302021-08-19T04:32:02+5:30
बल्लारपूर : बाबासाहेबांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या पहिल्या पिढीतील धगधगता निखारा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी गेली ६० वर्षे ...

बल्लारपुरात रंगली लोकशाहीरांची मैफिल; वामनदादांच्या गीतांनी आठवणीला उजाळा
बल्लारपूर : बाबासाहेबांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या पहिल्या पिढीतील धगधगता निखारा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी गेली ६० वर्षे विविध विषयांवर गीत लेखन करून व लोकगीतांमधून दादांनी लोकांना जागृत केले. त्यांनी लिहिलेल्या व गायिलेल्या गीतांनी त्यांच्या जयंतीनिमित्त आठवणीला उजाळा देण्यात आला.
वामनदादा कर्डक यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गोरक्षण वॉर्डातील आम्रपाली बुद्ध विहार येथे (सात खोली) हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड. प्रियंका चौहान, कवी नरेंद्र सोनारकर, कशिश वेले, दीक्षा दयानंद, अलका गुढे, कपिल ढाले, अजय चौहान यांनी वामनदादांच्या आठवणी सांगून त्यांची अजरामर गीते तुफानातले दिवे, भीमा तुझ्या मताचे, दलित शोषित, पीडितांच्या विविध विषयांवर भाष्य करणारी गीते गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. रजनीश खेकारे, क्षितिज खैरकर, रितिक खैरकर, शोभना शंभरकर, प्राजक्ता पाटील, पीयुष बैस, क्रिस्टीफर अंथोनी यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.