रामनामाने दुमदुमला तुकूम परिसर

By Admin | Updated: April 17, 2016 00:41 IST2016-04-17T00:41:47+5:302016-04-17T00:41:47+5:30

मागील अनेक वर्षांपासून तुकूम येथील श्रीराम शोभायात्रा हर्षोल्लासात निघत असते. यावर्षीही तुकूम परिसर रामनामाने दुमदुमला.

Ramnama Dumdulam Tukoom Complex | रामनामाने दुमदुमला तुकूम परिसर

रामनामाने दुमदुमला तुकूम परिसर

चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून तुकूम येथील श्रीराम शोभायात्रा हर्षोल्लासात निघत असते. यावर्षीही तुकूम परिसर रामनामाने दुमदुमला.
आमदार नाना शामकुळे, परिट समाजाचे अध्यक्ष प्रमोद केळझरकर, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, मंडळाचे अध्यक्ष वामन निंदेकर, माजी सभापती मायात मांदाडे यांनी विधीवत पूजा करुन शोभायात्रेचे उद्घाटन केले. या शोभायात्रेत वॉर्डातील लहान मुलांनी राम, हनुमान, सीता, लक्ष्मण यांची वेशभूषा केली. अनेक भजन मंडळांनी सहभाग घेतला आणि अनेक मोहल्ला कमिटीने शोभायात्रेचे स्वागत करून सरबट वाटप, बुंदा वाटप, जिलेबी वाटप केले. श्रीराम सेना तुकूमचे अध्यक्ष कल्पेश रणदिवे व गुरुदेव सेवा मंडळ येथील महिलांनी सरबत वाटप करुन स्वागत केले. या शोभायात्रेत वॉर्डातील पाच हजार भक्तांचा सहभाग होता.
श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वामन निंदेकर, उपाध्यक्ष प्रताप भाके, सचिव अनिल भोयर, सहसचिव नामदेव लांजेकर, कोषाध्यक्ष विजय लोखंडे, संपर्क प्रमुख विजय ठकरे, बळीराम मेश्राम, भास्कर भाकरे, नारायणसिंह बैस, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपाध्यक्ष विठ्ठल मसादे, सचिव आनंद मांदाडे, कार्याध्यक्ष कचाटे, तसेच प्रमोद शास्त्रकार, पुरुषोत्तम सहारे, शिला चव्हाण, कल्पना गिरडकर आदींनी शोभायात्रेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ramnama Dumdulam Tukoom Complex