ख्रिस्ती बांधवांचा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: August 10, 2014 22:54 IST2014-08-10T22:54:53+5:302014-08-10T22:54:53+5:30
इतर जातीप्रमाणे ख्रिश्चन समाजालाही शासनाने आरक्षण लागू करावे या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांनी कोरपना तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले.

ख्रिस्ती बांधवांचा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
गडचांदूर : इतर जातीप्रमाणे ख्रिश्चन समाजालाही शासनाने आरक्षण लागू करावे या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांनी कोरपना तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
निवेदनामध्ये रंगनाथ मिश्रा कमिटीने शिफारस केल्याप्रमाणे ख्रिस्ती समाजाला शासकीय व अशासकीय नोकरीमध्ये मुस्लीम समाजाप्रमाणे पाच टक्के आरक्षण लागू करावे. मदर टेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ख्रिस्ती समाजाची बेरोजगारी दूर करावी, खिस्ती शाळांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देऊन अनुदान देण्यात यावे, कोरपना येथे कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून त्याचा विकास करावा, समाज मंदिर बांधून द्यावे अशा विविध मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहे.
वरील मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा व विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ख्रिस्ती बांधवांनी दिला आहे. आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेला अल्बर्ट फ्रान्सीस, रमेश मल्लेलवार, नोही मोहितकर, नारायण मोहितकर, शालिक दुर्लावार, धनंजय कामपेल्ली, सुधाकर यलमेलवार, सुरेश अवनुरी, बापुराव मोहितकर, गंगारेड्डी मल्लेलवार आदी ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)