पोलीस कर्मचाऱ्यांचे रक्षाबंधन हे नागरी कर्तव्यच आहे
By Admin | Updated: August 19, 2016 01:58 IST2016-08-19T01:58:57+5:302016-08-19T01:58:57+5:30
पोलीस अधिकारी व कर्मचारी देशांतर्गत कायदा व व सुव्यवस्था सक्षम राखण्यासाठी अहोरात्र झटत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा अनुभवता येते.

पोलीस कर्मचाऱ्यांचे रक्षाबंधन हे नागरी कर्तव्यच आहे
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : पोलीस अधिकाऱ्यांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम
चंद्रपूर : पोलीस अधिकारी व कर्मचारी देशांतर्गत कायदा व व सुव्यवस्था सक्षम राखण्यासाठी अहोरात्र झटत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा अनुभवता येते. सतत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन करुन आपले नागरी कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने करण्यात येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
ना. अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसोबत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी, भाजपा नेते, महिला नगरसेविका यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक संदीप दिवान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, एसडीपीओ प्रल्हाद गिरी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ताजने, भाजपा नेते विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, प्राचार्य कीर्तीवर्धन दीक्षित, भाजपा गटनेते अनिल फुलझेले, क्षेत्रीय महाप्रबंधक आभा सिंह, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष वनिता कानडे, प्रा. ज्योती भुते, माया मांदाडे, नगरसेविका अंजली घोटेकर, वनश्री गेडाम, माया उईके, स्वरूप असरानी, ललीता गराट, वायकर, जयश्री जुमडे, सुषमा नागोसे, शिला चव्हाण, स्मिता नंदनवार, कोठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित भाजपा महिला पदाधिकारी व नगरसेविकांनी जिल्हा प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधल्या व केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी राखी बांधल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्यातर्फे उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा रक्षा बंधनानिमीत्त भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)