इंधन दरवाढीविरोधात राकाँचे मूलमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:24+5:302021-03-15T04:26:24+5:30

मूल : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सूचनेनुसार मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी बॅनर होर्डिंग्ज ...

Rak's agitation against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात राकाँचे मूलमध्ये आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात राकाँचे मूलमध्ये आंदोलन

मूल : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सूचनेनुसार मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी बॅनर होर्डिंग्ज लावून पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती, बेसुमार वाढलेली बेरोजगारी, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, जी. डी. पी.ची घसरण याविरोधात मूल शहरात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.

पेट्रोलपंप, सोमनाथ रोड, चंद्रपूर रोड, नागपूर रोड आदी ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते सुमित समर्थ यांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ कमी झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. निषेध आंदोलनात किसन वासाडे, महिला शहराध्यक्ष अर्चना चावरे, भास्कर खोब्रागडे, प्रशांत भरतकर, हेमंत सुपणार, सुरज तोडसे, इंद्रपाल पुणेकर, रितीक संगमवार, हरिदास मेश्राम, राहुल बारसगडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rak's agitation against fuel price hike