राजुरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाची गाडी तोडली
By Admin | Updated: July 28, 2015 02:14 IST2015-07-28T02:14:59+5:302015-07-28T02:14:59+5:30
राजुरा शहरात वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय झाली असून त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

राजुरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाची गाडी तोडली
राजुरा : राजुरा शहरात वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय झाली असून त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी देशपांडेवाडी येथे राहणाऱ्या राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार याच्या एम.एच. ३४ एएम २११५ या वाहनाचे काच अज्ञात समाजकंटकाने फोडून टाकले.
यापूर्वीसुद्धा रामनगर कॉलनीतील जगन गोप आणि राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. प्रशांत गुंडावार यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. (शहर प्रतिनिधी)