राजुरा नगरपरिषदेतील अधिकारी गायब

By Admin | Updated: October 24, 2016 00:55 IST2016-10-24T00:55:08+5:302016-10-24T00:55:08+5:30

राजुरा नगरपालिकेबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

Rajura Town Council officials disappeared | राजुरा नगरपरिषदेतील अधिकारी गायब

राजुरा नगरपरिषदेतील अधिकारी गायब

स्वच्छतेचे तीन तेरा : ट्री गार्ड स्लॅबवर अस्ताव्यस्त पडलेले 
बी. यू. बोर्डेवार राजुरा
राजुरा नगरपालिकेबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने शुक्रवारी नगरपरिषद राजुरा येथे दुपारी फेरफटका मारला असता एकही अधिकारी आढळून आला नाही. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे दालन खुले होते. अधिकारी नव्हते, त्यांच्या बाजूला असलेले नगर परिषदेचे अधीक्षक यांचे दालनही रिकामे होते. पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग यात कुठलाही अधिकारी आढळून आला नाही. पाणी पुरवठा विभागाच्या बाजूला भिंतीवर गुटखा खाऊन थुंकल्याची घाण होती. स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळविणाऱ्या नगर परिषद राजुराच्या कार्यालयात अस्वच्छता आढळून आली.
थोडे वरच्या बाजूला गेले असता पाण्याची टाकी वर्षभरापासून स्वच्छ केली नसल्याचे आढळून आले. पाण्याच्या टाकीला झाकण नव्हते. वृक्ष संवर्धनासाठी आणलेले ट्री गार्ड स्लॅबवर अस्ताव्यस्त फेकून आढळले. हाच वृक्ष संवर्धाचा प्रकार आहे काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शासनाच्या वृक्ष संवर्धनाची एैशीतैसी होत असल्याचे राजुरा नगर पालिकेत आढळून आले. स्लॅबवर अस्ताव्यस्त पडलेले प्लॉस्टिकच्या साहित्यामुळे कचरा नष्ट करण्याऐवजी स्लॅबवर टाकून ठेवण्याचा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळाला. पाण्याच्या टाकीच्या भोवताल स्लॅबवर कचरा उगवलेला दिसला. राजुरा नगर पालिका स्वच्छतेच्या मोठ्या बाता करतात. मात्र या नगर पालिकेचे अधिकारी यांचे कुठल्याच प्रकारचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले आहे.
एकीकडे भारताचे पंतप्रधान स्वच्छता मोहीम राबवित असताना राजुरा नगर पालिका कार्यालयात मात्र दोन ट्रक कचरा वेस्ट मटेरीयल निघेल, एवढा साचून ठेवलेला आढळून आला.

Web Title: Rajura Town Council officials disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.