शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षाच्या मुलाने केली ५५ वर्षीय महिलेची हत्या; घराच्या भिंतीवरुन उडी मारुन आत घुसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:42 IST

चंद्रपुरात उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय महिलेची निर्घृणपणे हत्या केली.

Chandrapur Crime: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. राजुरा येखील रमाबाई नगर परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय महिलेची हत्या केली. महिलेने आरोपी मुलाला उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिला होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाने कट रचून महिलेची हत्या केली. पोलिसांनी  याप्रकरणी विधीसंघर्ष बालकाला संशयावरून रविवारी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, मुलाने सिगारेट उधारीवर न दिल्याने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

राजुरा शहरातील रमाबाईनगर येथे सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून कविता रायपुरे (वय ५३) यांचा खून झाल्याचे समोर आलं आहे. १५ जून रोजी घडलेल्या या घटनेचा पाच दिवसांनी तपास उलगडत राजुरा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. कविता रायपुरे यांचे रमाबाईनगर येथे किराणा दुकान होते. घटनेच्या दिवशी एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या दुकानात येऊन सिगारेट उधारीवर मागितली. त्यांनी पैसे नसल्यामुळे नकार दिला. याचा राग मनात ठेवून, त्या रात्री १२ ते १ दरम्यान घरात कुणी नसल्याची संधी साधत, आरोपीने घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला आणि धारदार शस्त्राने वार करत कविता रायपुरे यांचा खून केला.

घटनेच्या दिवशी कविता रायपुरे यांचा मुलगा हा सुरक्षा रक्षक असल्याने कामावर गेला होता. रविवारी सकाळी कविता यांची मुलगी ममता ही दुकानातील फ्रीजमधून दूध आणण्यासाठी आली होती. मात्र दुकान बंद असल्याचे आणि कंपाउंड गेटला टाळे असल्याने ममताने स्वतःच चावीने गेट उघडले. त्यानंतरही आईचा कोणताही प्रतिसाद न आल्याने ममताने खिडकीतून डोकाऊन पाहिले तेव्हा त्या बेडवर निपचित पडल्या होत्या. त्यामुळे ममताने  तिच्या पतीला बोलवलं आणि दरवाजा उघडला. बेडरुममध्ये गेल्यानंतर ममताच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कविता यांचा मृतदेह ताब्यात घेतला. 

पोलिसांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यासोबत पोलिसांनी आजूबाजूच्या ४० ते ५० जणांची चौकशी देखील केली. मात्र काहीच पुरावा हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांना एका अल्पवयीन मुलाला कविता यांनी उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं.

कविता यांचा खून करण्यापूर्वी आरोपीने मोबाईलवरुन माहिती गोळा केली होती. त्यानंतर त्याने ब्राऊजिंग हिस्ट्री डिलिट केली आणि हुबळीला निघून गेला. मात्र पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध कलम ३३२ (ब), १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन आरोपीकडून घटनेत वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस