राजन जयस्वाल यांची विदर्भ साहित्य संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

By Admin | Updated: April 26, 2016 00:39 IST2016-04-26T00:39:43+5:302016-04-26T00:39:43+5:30

विदर्भ साहित्य संघाच्या २०१६ ते २०२१ करिता नुकतीच कार्यकारिणी निवडण्यात आली.

Rajan Jaiswal elected as Deputy President of Vidarbha Sahitya Sangha | राजन जयस्वाल यांची विदर्भ साहित्य संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

राजन जयस्वाल यांची विदर्भ साहित्य संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

चंद्रपूर : विदर्भ साहित्य संघाच्या २०१६ ते २०२१ करिता नुकतीच कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात प्रसिद्ध कवी डॉ. राजन जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेतील ही कार्यकारिणी नागपूर येथे घोषित करण्यात आली. त्यात त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राजन जयस्वाल प्रसिद्ध कवी असून विदर्भातील व्यासंगी वक्ता, कवी, समीक्षक व विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच झाडीबोली साहित्याचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे कवितासंग्रह व अन्य विषयावरील चिंतनशील पुस्तके प्रकाशित आहेत. प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहे. त्यांच्या निवडीने चंद्रपुरकर साहित्यसेवेला नव आयाम मिळणार असून जिल्ह्याला सक्षम लेखननेतृत्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajan Jaiswal elected as Deputy President of Vidarbha Sahitya Sangha