शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

रेनवॉटर हार्वेस्टिंगला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:10 IST

शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टीम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला.

ठळक मुद्देगांभीर्य उरले नाही : आपल्या निर्णयाचा मनपालाच विसर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टीम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला. मात्र त्यानंतर मनपाला आपल्या धोरणाचा विसर पडल्याचे दिसते. काही इमारतींचा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी ही सिस्टीम बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही पावसाचे पाणी जमिनीत मुरणे कठीण आहे.चंद्रपूर शहराला हॉट सिटी म्हणून संबोधले जाते. येथील उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात ४९ अंश सेल्सीयसपर्यंत चंद्रपूरचे तापमान पोहचते. विशेष म्हणजे, सगळीकडे उन्हाळा चार महिन्यांचा असला तरी चंद्रपुरात तो सहा महिन्यांचा असतो, असे आजवरचा अनुभव आहे. तीव्र उष्णतामानामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. त्यामुळे जलस्रोत आटून अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे पाणी जमिनीत मुरणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज बघता घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसणे गरजेचे आहे.दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेने शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ही सिस्टीम नसली तर बांधकामाला मनपाकडून परवानगी देण्यात येणार नाही, असाही धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करताना मनपाने गंभीरता दाखविली नाही.परिणामी बोटावर मोजण्याइतक्या इमारतींमध्येही ही सिस्टीम बसविल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्याचे पाणीही जमिनीत न मुरता नाल्यांवाटे वाहून जाणार आहे.उदासीनतेमुळे जमिनीत पाणी मुरणे कठीणनद्यांचे पात्रही झपाट्याने आटतेचंद्रपूर शहराला लागून इरई व झरपट या दोन नद्या आहेत. यातील झरपट नदीचे तर केव्हाच वाटोळे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस सोडले तर या नदी पात्रात तुरळक पाणी असते. इरई नदीत बऱ्यापैकी पाणी असते. मात्र उन्हाळ्यात या नदीचे पात्रही तळ गाठते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी आणखी जलदगतीने खाली जाते.करात मिळणार होती सूटचंद्रपूर मनपा हद्दीत असलेल्या ज्या इमारतधारकांनी आपल्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली असेल, त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देण्याचाही निर्णय तेव्हा मनपाने घेतला होता. असे केल्याने मालमत्ताधारक स्वयंस्फूर्तीने ही सिस्टीम बसवतील, असे मनपाला वाटले. मात्र तसे झाले नाही. मनपाने याबाबत अधिक तगादा लावला नाही. त्यामुळे बहुतांश इमारतधारक या सिस्टीमच्या भानगडीत पडले नाही.जनजागृतीचा अभावशहरातील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविणे हा महत्त्वाकांक्षी निर्णय होता. यात लोकसहभाग मिळविण्यासाठी मनपाकडून व्यापक जनजागृती व सततचा पाठपुरावा अपेक्षित होता. मात्र मनपा प्रशासन असे करण्यात अपयशी ठरले. खुद्द मनपा प्रशासनच याबाबत गंभीर नसल्याने चंद्रपूरकरांनीही ही बाब गंभीरतेने घेतली नाही.