नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:04+5:302021-07-21T04:20:04+5:30

मूल शहरात विविध विकास कामाअंतर्गत वॉर्डावॉर्डात सिमेंट रस्ते आणि नाल्या बनविण्यात आल्या आहे. मात्र हे बांधकाम करताना योग्य ...

Rain water infiltrated into the homes of the citizens | नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

मूल शहरात विविध विकास कामाअंतर्गत वॉर्डावॉर्डात सिमेंट रस्ते आणि नाल्या बनविण्यात आल्या आहे. मात्र हे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने पाणी नालीतून न वाहता चक्क घरात शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबड उडाली. ही माहिती मिळताच मूलचे तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांनी भेट देऊन नागरिकांना धीर दिला. अचानक घरात आलेल्या पावसाने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला.

रस्ते व नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. याचा वाॅर्ड क्र. ९ आणि १० येथील सुभाष नगरातील रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. पुन्हा असे घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मूल व नगर परिषद मूलने लक्ष घालून समस्या दूर करण्याची मागणी वाॅर्डातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Rain water infiltrated into the homes of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.