रेल्वेने गिळंकृत केला पांदण रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:47+5:302021-03-18T04:27:47+5:30
विसापूर : येथील स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलापासून जाणारा पांदण रस्ता रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावरची माती खोदून बंद ...

रेल्वेने गिळंकृत केला पांदण रस्ता
विसापूर : येथील स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलापासून जाणारा पांदण रस्ता रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावरची माती खोदून बंद केला व मोठमोठे खड्डे खोदल्याल्यामुळे ते आता गिळंकृत केल्यासारखे वाटू लागले आहे.
पोल क्र.८८५/१सी पासून ट्रॅकच्या बाजूला भरण भरण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे भरण रेल्वेने आखून दिलेल्या हद्दीत असलेल्या जागेतून घेतले आहे. असे तिथे काम करणाऱ्या सुपरवायझरचे म्हणणे आहे. तर शेतात अतिक्रमण करून शेतातील माती खोदत आहे, असा आरोप यामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यानी केला आहे. याबाबतची तक्रार, माहिती भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच पांदण रस्ता अस्तित्वात आहे. ब्रिटिशकाळातसुद्धा हा रस्ता पूर्वीच्या चांदा (चंद्रपूर)ला जाण्यासाठी विसापूरकर वापरत होते. आताही हा रस्ता शेतकरी शेतात व भिवकुंडला जाण्यासाठी वापरतात. रेल्वे विभागाने तो खोदून मार्ग पूर्णपणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे आता शेतात कसे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यापूर्वी चौथ्या रेल्वे लाईनच्या भूमी अधिग्रहणाच्या वेळी रेल्वेने संबंधित भूधारकांना नोटीस बजावून भूमी अभिलेख कार्यालयाच्या साहाय्याने भूमी अधिग्रहण केले होते. त्याप्रमाणेच हे कार्य करायला केले पाहिजे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.