रेल्वे गेट ठरतोयं विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी
By Admin | Updated: March 2, 2015 01:08 IST2015-03-02T01:08:29+5:302015-03-02T01:08:29+5:30
राजुरा शहरातील आसिफाबाद मार्गावरील केवळ सिमेंट कंपनीच्या वाहुकीसाठी तयार झालेले रेल्वे गेट विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

रेल्वे गेट ठरतोयं विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी
राजुरा: राजुरा शहरातील आसिफाबाद मार्गावरील केवळ सिमेंट कंपनीच्या वाहुकीसाठी तयार झालेले रेल्वे गेट विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसातून १० ते १५ वेळा हे गेट अर्धा-अर्धा तास बंद राहत असते. या गेटच्या पुढे अनेक शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांना गेटवरून गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथे उड्डाणपुल निर्माण करण्याची मागणी होत आहे.
येथील शिवाजी महाविद्यालय, पीएम डीएड कॉलेज, सिद्धार्थ तेलगू विद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एका इंग्लिश कॉन्व्हेंट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र माध्यमिक विद्यालय, नगर परिषद प्राथमिक शाळा या गेटच्या पलिकेकडे आहे. त्यामुळे या गेटवरून दररोज चार ते पाच हजार विद्यार्थी येणे-जाणे करतात. मात्र, सकाळी नेमके शाळा भरतानाच गेट बंद असतो तर शाळा, महाविद्यालय सुटतांनाही पुन्हा गेट बंद असतो.
गेट एकीकडे आहे तर रेल्वे स्टेशन दुसरी कडे आहे. मात्र, रेल्वेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थी भिजत गेट उघडण्याची उभे राहून प्रतीक्षा करीत असतात. राजुरा येथील रेल्वे गेट केवळ सिमेंट कंपन्याचे लाड पुरविण्यासाठी असून या गेट व रेल्वे ट्रॅकमुळे सामान्य मानसाला फटका बसत आहे. या सर्व कंपन्या वर्षाला २०० करोडच्यावर नफा कमवितात. मग येथे उडान पुल या कंपन्यांनी बांधून का दिला नाही. परंतु, अशी मागणी करणारे लोकप्रतिनिधी नाही. या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून हजारो नागरिक त्रास सहन करीत आहे. परंतु, एक आंदोलन करण्याची धमक कुणामध्ये दिसत नाही, ही मोठी शोंकातीका आहे. केवळ निवडणुका आल्या की मतदार आठवतात. निवडणूक संपली सर्व दुर्लक्ष. त्यामुळे येथील रेल्व गेटवरुन उड्डान पूल निर्माण करण्याची मागणी नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे (शहर प्रतिनिधी)