शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:36 PM

राजुरा- बामणीदरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुमारे सात वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम अंदाजपत्रक सुरुवातीला आठ कोटी रुपये होते. यात सातत्याने वाढ होत जाऊन आता २८ कोटी झाले आहे. तरीपण बांधकाम अपूर्ण आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. यामुळे बरेचदा अपघात, कंबरेचा व मानेचा त्रास सोसावा लागत आहे.

ठळक मुद्देवाढीव अंदाजपत्रकाचे मीटर सुरू : कंत्राटदार व अभियंता यांचे खिसे गरम

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा- बामणीदरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुमारे सात वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम अंदाजपत्रक सुरुवातीला आठ कोटी रुपये होते. यात सातत्याने वाढ होत जाऊन आता २८ कोटी झाले आहे. तरीपण बांधकाम अपूर्ण आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. यामुळे बरेचदा अपघात, कंबरेचा व मानेचा त्रास सोसावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कंत्राटदाराकडून दंड वसूल करून गप्प बसत आहे. आम जनतेस होणाऱ्या त्रासाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी कंत्राटदाराच्या हिताचे वाढीव अंदाजपत्रक तयार केले जात नसल्याने शासनाची तिजोरी खाली होत आहे.महाराष्टÑ राज्यातून तेलंगणा, मद्रास, बेंगलोर, हैद्राबादकडे जाणाºया हा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारे ट्रक व इतर वाहन जाणे-येणे करतात. या रेल्वे मार्गाने दररोज २०० ते २५० रेल्वे गाड्या जातात. त्यामुळे दर १५ मिनिटात रेल्वे गेट बंद होतो. त्यावेळेस शेकडो वाहने दोन्ही बाजूला उभे राहतात. रेल्वे गेट उघडताच वाहन काढताना वाहतूक कोंडी होते. त्यात बराच वेळ वाया जातो.तेवढ्यात दुसरी रेल्वे गाडी येते आणि वाहतूक थांबवून गेट बंद केले जाते. त्यात वाहनचालक वैतागून जातात.सुमारे पाच वर्षापासून मार्च- डिसेंबरपर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. परंतु ते स्वप्न साकार होण्यास पुन्हा किती वर्ष लागणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास दोन वर्ष पुन्हा त्रास सहन केल्याशिवाय पर्याय नाही, असे कुंभकर्णी झोपेतील अभियंत्यांच्या कार्य पद्धतीवरुन दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे.वळण रस्त्याचे निकृष्ट बांधकामरेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ६०० मीटर लांब वळण रस्ता तयार करण्यात आला. सुरुवातीला यावर अंदाजपत्रकानुसार ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले. अंदाजपत्रक तयार करताना वाहनाची संख्या, क्षमता व बांधकामाचा कालावधी यानुसार वळण रस्ता तयार करण्यात आला. परंतु पावसाच्या पहिल्याच सरीत खड्डे पडून दरवर्षी वाहतुकीस अयोग्य बनत राहिला. आम जनतेचे ओरडणे सुरु होताच नवीन अंदाजपत्रक तयार केले जात होेते. व थातूर मातूर नियमबाह्य दुरुस्ती करुन कंत्राटदाराच्या घशात रक्कम टाकली जात होती. यावर्षी पावसात पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती नोव्हेंबरमध्ये करण्यात आली. आणि अवघ्या १५ दिवसात रस्ता उखडला आणि आता नुकतेच पुन्हा दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे. तीसुद्धा नियमबाह्य असल्यामुळे पावसाच्या पहिल्या झटक्यात उखडून निश्चित खड्डे पडणार आहे. दुरुस्ती करताना चौकोन खोदण्यात आले नाही. चार इंचेचे खोल लेवल करण्यात आले नाही. खड्ड्याची सफाई करुन लेवल न करता थातूरमातूर गिट्टी टाकून डांबराचा छिडकाव केल्यामुळे पावसापूर्वी निश्चित उखडून खड्डे पडणार असल्याचे सेवानिवृत्त बांधकाम कर्मचाºयांकडून खात्री देण्यात येत आहे. त्यामुळे पावसात दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूकदाराच्या नशिबी खड्डयातून वाहन चालवित प्रवास करावा लागणार आहे. यात अभियंता व कंत्राटदाराचे अंदाजपत्रकाचे मीटर चालू राहणार असून आतापर्यंत अंदाजे एक कोटी २० लाख रुपये वळण रस्त्यावर शासनाने खर्च केले आहे. तरीही खड्ड्याचा वळण रस्ता ही शोकांतिका कायम आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची गरज आहे. दुरुस्तीचा देखावा करुन बिल पास करणाºया अभियंत्यांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.