नांदा येथे दोन गटांत राडा, नांदा येथे तीन तास चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:35+5:302021-02-05T07:38:35+5:30
दरम्यान, गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दारूविक्रेते व सट्टाबाजांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. मारहाणप्रकरणी नांदाफाटा ...

नांदा येथे दोन गटांत राडा, नांदा येथे तीन तास चक्काजाम
दरम्यान, गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दारूविक्रेते व सट्टाबाजांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
मारहाणप्रकरणी नांदाफाटा येथील लखन बावणे (वय ३५), सुनील बावणे (६०), सदाशिव पारधी (४९), कैलाश पारधी (२५), प्रदीप बावणे (३३) इतर आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्षा रितिका ढवस, हेमंत काळे, विजय ढवस, शोभा ढवस यांना किरकोळ मार लागला, असा आरोप करीत गडचांदूर-आवारपूर रस्त्यावर तीन तास चक्काजाम केला.
आरोपी असलेल्या लखन बावणे याचा हात मोडला असून त्याच्या वैद्यकीय तपासणीअंती दुसऱ्या गटातील मंडळींविरुद्धही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, दीपक जयस्वाल, आबीद अली, गडचांदूर उपनगराध्यक्ष शरद जोगी, ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, हरून सिद्दिकी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे आदींनी पोलिसांशी चर्चा करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली.