शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

मनपाच्या भर सभेत सत्ताधारी व काँग्रेसमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

ऑनलाईन सभेच्या नावाखाली बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रश्न विचारल्याने सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व काँग्रेस सदस्यांमध्ये सभागृहातच जोरदार राडा झाला. संतापाने महापौरांनी नेमप्लेट भिरकावली तर स्थायी समितीचे सभापती आसनावरून खाली उतरून नगरसेवकाच्या अंगावर धावताच धक्काबुक्की होऊन सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. हा प्रकार गुरुवारी दुपारी १ वाजता चंद्रपूर मनपाच्या ऑनलाईन सभेत घडला.

ठळक मुद्देसभागृहात धक्काबुक्की : सभापती नगरसेवकाच्या अंगावर धावले, महापाैर व नागरकरांची एकमेकांविरूद्ध पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑनलाईन सभेच्या नावाखाली बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रश्न विचारल्याने सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व काँग्रेस सदस्यांमध्ये सभागृहातच जोरदार राडा झाला. संतापाने महापौरांनी नेमप्लेट भिरकावली तर स्थायी समितीचे सभापती आसनावरून खाली उतरून नगरसेवकाच्या अंगावर धावताच धक्काबुक्की होऊन सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. हा प्रकार गुरुवारी दुपारी १ वाजता चंद्रपूर मनपाच्या ऑनलाईन सभेत घडला. सभागृहातील या अभूतपूर्व राड्याची चित्रफित समाज माध्यमांमध्ये झपाट्याने व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय झाला आहे.कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाच्या राणी हिराई सभागृहात गुरुवारी  ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत २३ जून २०२१ झालेल्या ऑनलाईन सभेचे कार्यवृत्त वाचून मंजूर करणे, ६ मे व ३१ मे २०२१ रोजी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या कार्यवृत्ताची माहिती देणे आणि मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक कोविडने मृत्यू झाल्याने त्या कुटुंबाला सानुग्रह मदत देण्याच्या विषयावर चर्चा केली जाणार होती. दुपारी १ वाजता राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली. यावेळी राणी हिराई सभागृहात महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. कोविड प्रतिबंधामुळे काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकूलकर, नगरसेवक नंदू नागरकर,  सुनिता लोढीया,  अमजद अली, संगीता भोयर,  नीलेश खोब्रागडे,  सकीना अंसारी, वनिता खनके, अशोक नागापुरे यांनी ऑनलाईन सभेत सहभाग घेतला होता.

‘त्या’ नगरसेवकांना बडतर्फ करामनपाच्या आमसभेत धिंगाणा घालणाऱ्या मनसे व काँग्रेेसच्या नगरसेवकांना बडतर्फ करा,  अशी मागणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, प्रकाश धारणे यांनी केली आहे.

सत्ताधारी म्हणतात...

मागण्यांचे निवेदन महापौरांना न देता काँग्रेसच्या नगरसेवकांनी  ऑनलाईन सभेत सभागृहात येऊन गोंधळ घातला. महापौर राखी कंचर्लावार यासुद्धा संयमाने प्रश्न मांडा, असे सांगत होत्या. मात्र,  काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौरांच्या टेबलावर थाप मारली. हा प्रकार पाहून त्यांना समजाविण्यासाठी मी आसनावरून खाली उतरलो. कुणालाही धक्काबुक्की केली नाही. सभागृहात प्रश्न मांडण्याचा अधिकार आम्ही नाकारला नाही, असा दावा स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांनी केला.

विरोधक म्हणतात...

कोविड प्रतिबंधामुळे ऑनलाईन सभेत काँग्रेसचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. ही सभा आटोपल्यानंतर आयुक्त व महापौरांना महत्त्वाच्या तीन मागण्यांचे निवेदन सादर करणार होतो.  मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करून मनपा दोषींनाच अभय देत आहे. कोविडच्या नावाखाली  चर्चा टाळून मनमानी ठराव पारित करून घेत आहे. याला विरोध म्हणून सभागृहात प्रवेश करून प्रश्न विचारला. मात्र ,महापौर व स्थायी सभापतींनीच वाटेल ते बोलून राडा केला, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया व नंदू नागरकर यांनी केला आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहात नेमके काय घडले?

सभेला सुरुवात होताच मनसेचे नगरसेवक सचिन भोयर व समर्थकांनी अमृत योजनेवरून मनपाविरूद्ध घोषणाबाजी करीत थेट सभागृहातच प्रवेश केला.  हा प्रकार ऑनलाईन दिसताच संतापलेले काँग्रेसचे नगरसेवक बॅनर घेऊन सभागृहात गेले. ऑनलाईन सभेच्या नावाखाली बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप करून धारेवर धरले. यावरून विरोधक व पदाधिकाऱ्यांमध्ये  बाचाबाची झाली. काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी टेबलावर थाप मारताच महापौर राखी कंचर्लावार यांनी त्यांच्याच नावाची नेमप्लेट भिरकावली तर स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी हे आसनावरून खाली उतरून नागरकर यांच्यावर अंगावर धावून गेले व अश्लील शिवीगाळ केली. दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, नगरसेवक पचारे यांनी आसवानी यांना शांत केले.  तर आयुक्त हात जोडून विनंती केल्यानंतर महापौर व स्थायी सभापती कक्षात निघून गेल्याची चित्रफित समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे.

नंदू नागरकर यांच्यावर निलंबनाची कारवाईमनपाच्या सभागृहात सर्वसाधारण आमसभा सुरू असताना विनापरवानगी प्रवेश करत सभागृहात गोंधळ घातल्याचा ठपका ठेवून नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महापालिकेचे कामकाज प्रकरणमधील २ (१) नुसार निलंबित करण्याचे निर्देश महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले.

 

टॅग्स :MNSमनसेcongressकाँग्रेस