सोंडो येथे रब्बी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST2021-01-24T04:12:18+5:302021-01-24T04:12:18+5:30

राजुरा : सोंडो येथे रब्बी उन्हाळी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. खरीप २०२१ मध्ये ...

Rabbi Soybean Village Seed Production Training at Sondo | सोंडो येथे रब्बी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन प्रशिक्षण

सोंडो येथे रब्बी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन प्रशिक्षण

राजुरा : सोंडो येथे रब्बी उन्हाळी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. खरीप २०२१ मध्ये सोयाबीन बियाणे निराेगी राहावे व पेरणी क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले यांनी मार्गदर्शन केले. देवाडाचे मंडल कृषी अधिकारी चेतन चव्हाण यांनी कापूस फरदड निर्मूलन अभियानाची माहिती यांनी दिली. कृषी सहाय्यक सडमेक यांनी हरभरा पिकावरील घाटे अळी नियंत्रणाबाबत सल्ला दिला. शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे उत्पादन करण्याबाबत वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना तालुक्यातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी व सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञामार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात मागील वर्षी ३२ हजार क्विंटल बियाणे लागले होते. आता ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन लागवडीनंतर पाणी देण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करावी. लवकरच उन्हाळा सुरू होणार असल्याने येत्या ३ ते ४ दिवसात लागवड पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.

Web Title: Rabbi Soybean Village Seed Production Training at Sondo