एसटीच्या वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:23+5:302021-02-16T04:29:23+5:30
बसमधून प्रवास करताना टप्प्याप्रमाणे प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेतल्या जाते. एखाद्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान तीन टप्पे पडत असतील तर, त्या प्रवाशाला ...

एसटीच्या वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न
बसमधून प्रवास करताना टप्प्याप्रमाणे प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेतल्या जाते. एखाद्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान तीन टप्पे पडत असतील तर, त्या प्रवाशाला तिकीट लागते. प्रवाशाकडे चिल्लर पैसे असल्यास देतो. मात्र अनेक वेळा सुटी पेसे रहात नसल्याने वाहक त्या तिकिटामागे शिल्लक रक्कम लिहून देतो. एखाद्या टप्प्यात १७ रुपये तिकीट होत असल्यास तीन रुपये लिहून देतो. मात्र ब-याच वेळा चिल्लरचे नसल्याचे सांगून वाहकही निघून जातो. त्यामुळे त्या प्रवाशाला पैसे बुडवावे लागतात.
हा प्रकार बहुतेक वाहकांनी सुरू केल्याने चित्र असून चिल्लर नसल्याचे कारण पुढे करून वाहक पैसे परत देत नाही. परंतु एखाद्या प्रवाशांने एक रुपया कमी दिल्यास त्याला तिकीट देण्याचे सौजन्य वाहक दाखवित नाही. त्यामुळे ग्राहकांनी पैसे का सोडावे, असा प्रश्न अनेकदा प्रवासादरम्यान प्रवासी उपस्थित करीत आहेत. यावरून कित्येकदा शाब्दिक चकमकही उडते.
आता चक्क चिल्लरच्या नावाखाली दोन, चार, सहा, सात रुपये तिकिटामागे लिहून देतात. प्रवाशाचा टप्पा आल्यानंतर तो बसखाली उतरून वाहकाला तिकिटामागील लिहिलेले दोन ते तीन रुपये मागतात.
यावेळी वाहकही दोघा-तिघांमध्ये पैसे देऊन आपसात वाटून घेण्याचे सांगून मोकळे होतात. परिणामी एखाद्या प्रवाशाला दोन-तीन रुपये सोडून द्यावे लागतात. चिल्लरअभावी प्रवाशांसमोर नाइलाजाने वाहकाकडे दोन-तीन रुपये सोडल्याशिवाय पर्याय राहत नाही. वाहकांना चिल्लर नसल्याचा बराच फायदा होत आहे असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना मात्र त्यात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाने वाहकांना दिल्या जाणा-या निधीत चिल्लक पैसे जास्त प्रमाणात द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.