राजमाता जिजाऊ मानवी स्वातंत्र्याच्या राज्य निर्मात्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:25+5:302021-01-19T04:29:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : देशात मनुस्मृतीच्या कायद्यांचे राज्य होते. बहुजन समाजाला मानवी स्वातंत्र्यांचे अधिकार नाकारण्यात आले होते. समाज ...

राजमाता जिजाऊ मानवी स्वातंत्र्याच्या राज्य निर्मात्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात मनुस्मृतीच्या कायद्यांचे राज्य होते. बहुजन समाजाला मानवी स्वातंत्र्यांचे अधिकार नाकारण्यात आले होते. समाज स्वातंत्र्याचे अधिकारही नाकारण्यात आले होते. या समाज व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करुन राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनी मानवी स्वातंत्र्याचे राज्य निर्माण केले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तसेच बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती महिला मंच, वंदना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमा डुंबेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शहिदा वाकडे, तंजीम खवातीन, रमा मेश्राम, राजकला रंगारी, रमा बोरकुटे, वर्षा दरवेकर उपस्थित होत्या. वर्षा ढवस व वर्षा दरवेकर यांनी जिजाऊ व सावित्रीमाई यांचे वंदन गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. संचालन बीना चिवंडे यांनी प्रास्ताविक करुणा फुलझेले यांनी केले तर उषा डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामकला जिवने, रुपा नागापुरे, वैशाली रंगारी, माया रायपुरे, प्रेमिला बुटले, लक्ष्मी आमटे, रत्नमाला देवगडे आदींनी प्रयत्न केले.