घुग्घुसमधील वेकोलिचे क्वार्टर जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:56+5:302021-02-05T07:33:56+5:30
फोटो : उपमुख्य महाव्यवस्थापक पिसारेड्डी यांना निवेदन देताना नागरिक घुग्घुस :वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथील कामगार वसाहतमधील क्वार्टर जीर्ण ...

घुग्घुसमधील वेकोलिचे क्वार्टर जीर्ण
फोटो : उपमुख्य महाव्यवस्थापक पिसारेड्डी यांना निवेदन देताना नागरिक
घुग्घुस :वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथील कामगार वसाहतमधील क्वार्टर जीर्ण झाले असल्याने कामगार व कामगाराच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्या परिसरातील नाल्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कामगार वर्गाचे आरोग्य घोक्यात आले आहे.
वेकोलिच्या वणी क्षेत्राच्या कामगारांसाठी घुग्घुसमध्ये विविध प्रकारचे ३० वर्षांपूर्वी क्वार्टर बनविण्यात आले. त्या क्वार्टरच्या देखभालीकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. क्वार्टरच्या भिंतीला भेगा गेल्या. अनेक क्वार्टरच्या छताचे व भिंतीचे प्लास्टर पडत आहे. दुमजली क्वार्टरची गॅलरी पडली आहे. एकंदरीत कामगार वसाहतमधील अधिकांश क्वार्टर जीर्ण झाले. शौचालयाच्या टँकवरील झाकणे तुटलेले, पाइप तुटलेले, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुटल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्रज्य पसरले आहे.
त्यामुळे कामगार व कामगारांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. क्वार्टर जीर्ण झाल्याने जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्या असून व्यवस्थापनाने क्वार्टरची दुरुस्ती करावी, अशी मागणी वणी क्षेत्राचे अप्पर महाव्यवस्थापक पिसारेड्डी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज कनूर, युवक काॅंग्रेस अध्यक्ष तोफिक शेख, निखिल पुनगंटी, सुनील पाटील, कासीम शेख, नितीन दुर्गम, रायसमलू जंगम, नरेश कोरकंटी, संजय मानकर यांची उपस्थिती होती.