जिल्ह्यात सव्वा लाखांवर चाचण्या निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:24+5:30

रविवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कोहपरा ता. राजुरा येथील ७५ वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील ३८ वर्षीय पुरूष व ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २७६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

A quarter of a million tests in the district are negative | जिल्ह्यात सव्वा लाखांवर चाचण्या निगेटिव्ह

जिल्ह्यात सव्वा लाखांवर चाचण्या निगेटिव्ह

Next
ठळक मुद्दे६३ नवे पॉझिटिव्ह : चार कोरोना बाधितांचा मृत्यू

  लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४९ हजार ७८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख २६ हजार ७२० नमुने निगेटिव्ह आले आहेत. 
दरम्यान, जिल्ह्यात रविवारी चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ६३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १९ हजार ७५५ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ७२९ झाली आहे. सध्या एक हजार ७२७ बाधितांवर उपचार सुरू आहे. 
रविवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कोहपरा ता. राजुरा येथील ७५ वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील ३८ वर्षीय पुरूष व ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २७६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी  नागरिकांनी बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
१९ ते ४० वयोगटातील   ८६४६ बाधित
जिल्ह्यात एकूण १९ हजार ७५५ बाधित आतापर्यंत आढळून आले आहेत. यातील सर्वाधित म्हणजे ८६४६ बाधित हे १९ ते ४० वर्ष वयोगटातील आहेत. यावरून तरुणांनाच कोरोनाची जास्त बाधा होत असल्याचे दिसून येते. याशिवाय ० ते ५ वयोगटातील ३१४,  ६ ते १८ वयोगटातील १६४२, ४१ ते ६० वयोगटातील ६८५६ व ६१ वर्षांवरील २२९७ बाधित आतापर्यंत आढळून आले आहेत. याचाच अर्थ अजूनही कोरोनाची बाधा तरुणांमध्येच अधिक होत आहे.

Web Title: A quarter of a million tests in the district are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.